
जातीयवादी म्हणणारे हिंदूंची मते मिळविण्यासाठी वाढदिवसाला रामनवमीचा आधार घेतात.
कागलचे मंत्री जातीयवादी विषारी वेल; समरजितसिंह घाटगेंचा घणाघात
सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : हसन मुश्रीफ यांची पॅन कार्डवरील जन्मतारीख व शालेय शिक्षणातील जन्मतारीख यात तफावत आहे. ही तफावत का आहे याचे उत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी द्यावे अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष, कागल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Raje Samarjeet singh Ghatge) यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकारांनी समरजितसिंह घाटगे यांना छेडले असता त्यांनी मुश्रिफांवार निशाणा साधला.
कागलचे मंत्री स्वतःला वडाचे झाड म्हणताहेत. मात्र ते वडाचे झाड नाहीत. वडाचे झाड तर ही स्वर्गीय मंडळी होती. या झाडांना विळखा घालून त्यांच्या आधाराने मोठे झालेले मंत्री हे जातीयवादी विषारी वेल आहेत. ती कापण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मला जातीयवादी म्हणणारे हिंदूंची मते मिळविण्यासाठी वाढदिवसाला रामनवमीचा आधार घेऊन दिशाभुल करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच खरे जातीयवादी आहेत असा टोला त्यांनी हाणला. एकोंडी ता. कागल येथे विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांनी पुन्ही निशाणा साधला.
हेही वाचा: धार्मिक स्थळांवरील भोंग्यावर कारवाई टाळल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे, स्व.सदाशिवराव मंडलिक व स्व बाबासाहेब कुपेकर ही जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारी मंडळी होती. मात्र कागल तालुक्यातील काहींनी उतारवयात त्यांना त्रास दिला. या ऋषितुल्य मंडळींना झालेल्या त्या वेदना कशा विसरता येतील? असा सवाल मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे रोख ठेवत उपस्थित केला.
यावेळी वीरेंद्र मंडलिक म्हणाले, गोकुळमध्ये विश्वासघाताने झालेला माझा पराभव ही आमच्या गटाची भळभळती जखम आहे. राजे समरजितसिंह घाटगे व आमची चांगली मैत्री आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आमची काही बिनसलेले नाही. त्याची मुहूर्तमेढ आज रोवली आहे.
हेही वाचा: Photo l सांगलीच्या सुशांतची कमाल;वडिलांसाठी बनवली इलेक्ट्रिक सायकल
राजे मंडलिक गट एकत्र येतील
यावेळी कागल तालुक्यात सुरू असलेल्या चुकीच्या राजकारणाचा संदर्भ देत विकासात्मक राजकारणासाठी राजे व मंडलिक गटाने एकत्र येणे काळाची गरज आहे. तालुक्यात ब-याच ठिकाणी तश्या आघाड्या झाल्या आहेत. त्यादृष्टीने एकोंडी मधील हा कार्यक्रम नांदी ठरणार आहे. अशा आशयाचे वक्तव्य पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भोसले व शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम यांनी केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
Web Title: Samarjeet Singh Ghatge Reaction On Hasan Mushrif Birthday Date Kagal Political
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..