Kolhapur l कागलचं राजकारण तापलं; समरजीतसिंह घाटगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samarjeetsinh Ghatge Reply to Hasan Mushrif

श्रीराम मंदीराचा वापर समरजीत घाटगे यांच्याकडून राजकारनासाठी होत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढला आहे.

कागलचं राजकारण तापलं; समरजीतसिंह घाटगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कागल (कोल्हापूर) : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील राजकारण सध्या तापलयं. गेल्या आठवड्यात भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे (Raje Samarjeet singh Ghatge) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत श्रीरामाचा उल्लेख असल्याचा आक्षेप घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. तर आज हसन मुश्रीफ यांच्या गटाने कागल (Kagal) मधील श्रीराम मंदीराचा वापर समरजीत घाटगे यांच्याकडून राजकारणासाठी होत असल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून, गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढला आहे. यावरून कागलमध्ये वातावरण तापलं आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये; सचिन खरात यांची मागणी

हेही वाचा: ‘रझा अकादमी'च्या मुद्यावरून नितेश राणेंचा आघाडीवर निशाणा; म्हणाले...

मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या कारखान्याच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावातील पॅन कार्डवर व त्यांच्या वेबपेजवर त्यांची जन्मतारीख २४ मार्च १९५४ अशी आहे. बहुजन समाजाला गेली चाळीस वर्षे ते फसवत आहेत. श्रीराम मंदिरासाठी पंधरा हजार रुपये राजेंनी दिल्याचे सांगून त्यांनी स्व.राजेंचा अपमान केला आहे. राम मंदिराच्या जागी आमचा वाडा होता हे विसरून चालणार नाही. तो वाडा पाडला आहे. मंत्री मुश्रीफ यांनी धर्मासाठी आपली एक गुंठातरी जागा दिली का? हे सांगावे. राममंदिरला दिलेले हे शासनाचे पैसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Web Title: Samarjit Ghatge File Case Against Hasan Mushrif Party Worker Agitation Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top