esakal | शरद पवार छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक ; संभाजीराजे  

बोलून बातमी शोधा

sambhaji raje chhatrapati meet to sarthi protest

पुणे येथील सारथी संस्थेच्या कार्यालयासमोर आयोजित तारादूत आंदोलनाला त्यांनी भेट दिली

शरद पवार छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक ; संभाजीराजे  
sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर :  ज्येष्ठ नेते शरद पवार छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेली सारथी संस्था बंद पडू नये, यासाठी त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करत असल्याचेही ते म्हणाले.

पुणे येथील सारथी संस्थेच्या कार्यालयासमोर आयोजित तारादूत आंदोलनाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, "सारथी संस्था छत्रपती शाहू महाराजांचे जिवंत स्मारक असून, ती वाचवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे. एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगितले असून, कलम 25 नुसार संचालक मंडळाला काहीच अधिकार नाहीत. सरकार निर्णय घेईल, असे सांगत आहे. यावरून अद्याप या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून, तारदूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू."

हे पण वाचा - वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या दानवे यांना आता उपचाराची गरज

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव म्हणाले, "शासन सारथीला स्वायत्तता असल्याचे सांगत असले तरी दुस-या बाजूला सारथी संस्था तारादूतांचा प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार नसल्याचे सांगून विषय टाळत आहे. संभाजीराजे सारथीला भेट देणार असल्याचे माहिती असूनही संस्थेचे अध्यक्ष व संचालक उपस्थित नसणे, ही चुकीची बाब आहे." 

संपादन - धनाजी सुर्वे