मराठा समाजाच्या न्यायासाठी संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा समाजाच्या न्यायासाठी संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर : राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 पूर्वी शासकीय भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन त्वरित सेवेत सामावून घ्यावे, या आशयाचे पत्र खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना आज पाठविले. त्याबाबतचे वृत्त 'सकाळ'मध्ये पान नंबर तीनवर 'खुल्या जागांवर अन्य प्रवर्ग डोकेदुखी,' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेण्यात आली असून, संभाजीराजे यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा (maratha reservation)समाजास न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Sambhaji Raje wrote letter to the chief minister about maratha reservation justice kolhapur news

पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत 2018 पासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियेत नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. शासनाच्या एका अहवालानुसार 2185 मराठा उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली टाळेबंदी व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 ला मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती या कारणांमुळे शासनाकडून उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्रे देण्यास विलंब झाला.

सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 ला मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता सप्टेंबर 2020 पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे शासनाने अति विलंब न करता उमेदवारांना ते ज्या पदासाठी पात्र आहेत, त्या पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे आवश्यक आहे.

9 सप्टेंबर 2020 पूर्वी व त्यानंतर सुरु झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियेत सहभागी मराठा उमेदवारांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 4 जानेवारी 2021 ला काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामधील कलम तीनमधील उपकलमामुळे प्रवर्ग निवडणे बाबत संभ्रम होता. या प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी. व ओपन प्रवर्ग निवडला आहे, अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, असेही पत्रात म्हटले आहे.

Sambhaji Raje wrote letter to the chief minister about maratha reservation justice kolhapur news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com