आशा वर्करांचा रोजच संघर्ष; सर्व्हेकरून घरी जाताना वाढते चिंता

चेहऱ्यावर ताण येऊ न देता पुन्हा कुटुंबाचा हिस्सा
आशा वर्करांचा रोजच संघर्ष; सर्व्हेकरून घरी जाताना वाढते चिंता

कोल्हापूर : आशा वर्कर (aasha workers) सरिता दिगंबर मोरे, विद्या अरुण सोनवले व कल्पना शशिकांत गजगेश्वर घरची कामे आटोपून सकाळी कोरोना रुग्णांच्या सर्व्हेसाठी (covid-19 survey) बाहेर पडतात. लहान मुले-मुली कुटुंबातील इतर सदस्यांच्या हवाली करतात. दिवसभरात कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची कल्पनाही त्यांना नसते. प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांना स्वॅब (swab) घ्यावा लागतो. दिवसभरात सर्व्हेचे (daily survey) काम पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना मात्र प्रत्येकीच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटतात. ज्या नागरिकाचा स्वॅब घेतला, तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह (positive or nigative) याची माहिती त्यांना नसते. चेहऱ्यावर त्याचा फारसा ताण येऊ न देता त्या कुटुंबाचा पुन्हा हिस्सा होतात.

"रामानंदनगर (ramanad nagar kolhapur) येथे मी राहते. माझे शिक्षण बी.कॉम.पर्यंत (B.com)झाले आहे. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती एकदम उत्तम आहे. समाजकार्याची आवड म्हणून हे क्षेत्र निवडले आणि आशा वर्कर म्हणून नागरी आरोग्य केंद्र क्रमांक सात आयसोलेशन हॉस्पिटल (isholatine hospital kolhapur) येथे ७ जून २०१८ ला रुजू झाले. घरोघरी सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलन करणे, त्यांना कोणता आजार आहे का?, याची माहिती घेणे, ती आरोग्य केंद्रात पुरवणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, त्यांना शासनाच्या सोयी-सुविधांची माहिती पुरवणे, हे आमच्या कामाचे स्वरूप. पण, होतं उलटच. लोकच आम्हाला दारात उभा करून घेत नाहीत. तुम्ही कुठून आलात? कशाला हवी तुम्हाला आमची माहिती? आम्हाला द्यायची नाही माहिती," सरिता मोरे सांगत होत्या. कोरोनाच्या सर्व्हेबाबतही त्यांना विचारले. असता त्या म्हणाल्या,

आशा वर्करांचा रोजच संघर्ष; सर्व्हेकरून घरी जाताना वाढते चिंता
ठरलं! गोकुळ अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर; 'या' नावांची जोरात चर्चा

"कोरोनाचा सर्व्हे करताना खूपच त्रास झाला. रुग्ण सापडला की, अंगात पीपीई किट (PPE kit) घालायचे. अंगातून अक्षरश: घामाच्या धारा निघायच्या. लोकांच्या दारात गेल्यावर ते तुमच्यामुळेच आम्हाला काहीतरी होईल, असे बोलायचे. रुग्ण कधी सापडेल सांगता येत नाही. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत मोबाईलची रिंग वाजायची. खूप तणाव यायचा. माझ्या कुटुंबात नऊ जण आहेत. त्यात तीन लहान मुले आहेत. ती आई म्हणून धावत जवळ जायची. पण, दुर्दैव इतकं की, त्यांना प्रेमाने जवळ घेता येत नव्हते. आजही आमचा ठिकठिकाणी सर्व्हे सुरू आहे. मात्र, या कठीण परिस्थितीत सर्व कुटुंब माझ्या पाठीशी खंबीर आहे, याचाच मला अभिमान आहे," सरिता मोरे यांना हुंदका आवरणे कठीण झाले.

"कोरोना हा आजार माणसाचे जीवन संपवणारा असेल असे वाटले नाही. आमच्या भागात एक पॉझिटिव्ह रुग्ण आला अणि आमचे काम सुरू झाले. सगळयांना घरातून बाहेर पडताना भीती वाटायची अणि आम्हाला घरी जाताना. भागामधील लोकांचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल तपासणे व स्वॅब घेणे ही कामे सुरू झाली. सुरवातीला कोरोनाच्या भीतीने वाटायचे नको ही नोकरी. आता वाटते खरंच आपण किती महत्त्वाचे काम करतोय. त्याचं मनाला समाधान वाटतं," कल्पना गजगेश्वर यांनी कामातील अनुभव शेअर केला.

"मी राजेंद्रनगर येथे राहते. माझे शिक्षण बारावीपर्यंत आहे. समाजकार्य करण्याची खूप आवड आहे, म्हणून मी हे काम स्वीकारले. मी, माझे पती, सात वर्षांची मुलगी व दहा वर्षांचा मुलगा असे माझे कुटुंब आहे. मुलांना शेजारच्या घरात ठेऊन मे सर्वेक्षणाला बाहेर पडते. जीव मुठीत घेऊन हे काम करावे लागते. दिवसभरात कोण काय बोलेल, हे सांगता येत नाही. अशा वेळी मनावर संयम ठेवून समाजसेवा सेवेचे काम करावे लागते. या कामाची भीती आता मोडली आहे. आम्ही सगळ्या आनंदाने हे काम करत आहोत," विद्या सोनवले यांनी कामाचे श्रेय प्रत्येक आशा वर्करला दिले.

आशा वर्करांचा रोजच संघर्ष; सर्व्हेकरून घरी जाताना वाढते चिंता
अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' झाले 'आजोबा'

जिल्ह्यात दोन हजार आशा वर्कर्स

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दोन हजार आशा वर्कर्स काम करतात. शहरात सात सेंटरमध्ये आशा वर्कर्स कोरोना सर्वेक्षणाचे काम करतात. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळला. तेथून शंभर मीटर परिसरातील लोकांचा सर्व्हे करणे, त्यांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, स्वॅब घेण्याचे काम त्या करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com