esakal | आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग : संभाजीराजे

बोलून बातमी शोधा

null
आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग : संभाजीराजे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मराठा आरक्षणा (Maratha Reservation ) संदर्भात आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निकाल दिला. या निकालात मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठा आरक्षण देता येणार नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकार्य असल्याचे सांगत मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती की बहुजन समाजाला आरक्षण मिळावे. 1902 मध्ये त्यावेळी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होतो. त्यामुळेच माझा हा मराठ्यांसाठी लढा होता की मराठ्यांना बहुजन समाजामध्ये समावेश करून घेतल्यास जातीय मतभेद कमी होतील. मराठा आरक्षणा संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज या नात्याने माझा प्रयत्न होता. परंतु शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागेल. पण समाजाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत दुर्देवी प्रसंग आहे.

हेही वाचा: ममतांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदींनी दिल्या शुभेच्छा

पुढे ते म्हणाले, पूर्वीच्या सरकारनेही या कायद्याबाबतील जोमाने आपली बाजू मांडून हाय कोर्टाच्या माध्यमातून पारित झाला होता. या सरकारनेही आपली बाजू जोमाने मांडली आहे. जेवढं शक्य होईल तिथे त्यांनी केंद्र सरकारचीही मदत घेतली आहे. शक्य तिथे दोन्ही सरकारांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली होती. पंरतु शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम आहे.