accindent
accindent

Sangli : आटपाडी-दिघंची मार्गावर मोठा अपघात; कोठुळीच्या उपसरपंचाचा जागीच मृत्यू

Published on

आटपाडी : कौठूळी (ता.आटपाडी) ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पाटील यांचा आटपाडी ते दिघंची रस्त्यातवर दोन मोटर सायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजता घडली.

accindent
Kolhapur : श्री अंबाबाईसाठी ४७ तोळ्यांचा किरीट; किंमत तब्बल २४ लाख रुपये

सुभाष पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची बाजार समिती जवळील शाखेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच गेल्या वर्षी झालेली ग्रामपंचायत निवडणुक त्यांनी लढवली होते. ते कौठळी गावच्या उपसरपंच पदावर कार्यरत होते.

आज नेहमीप्रमाणे बँकेचे काम संपवून सायंकाळी आटपाडी दिघंची रस्त्यावरून गावाकडे निघाले होते. सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळून त्यांच्या वस्तीकडे रस्ता जातो. तिथे मोटरसायकल वळवून गावच्या रस्त्याकडे जाताना दिघंचीहून येणाऱ्या दुचाकी गाडीने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली.

accindent
Raj Thackeray : 'बारसू रिफायनरी'वरुन राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका; कातळ शिल्पाचे सॅटेलाईट फोटो...

मोटर सायकलची धडक अत्यंत भीषण होती. अपघात स्थळापासून शंभर फुटावर मोटरसायकल पडली होती. या अपघातात सुभाष पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com