Sangli Narcotics Crime: धिंडवडे...आता नशेखोरांचा ‘खाकी’वरही हात; नशेखोरांचा वाढता धुमाकूळ ः भयमुक्ती, नशामुक्तीचे ‘इव्हेंट’ ठरताहेत नुसतेच ‘फार्स’

Drug-Fuelled Violence Raises Security Concerns in Sangli-Miraj: सांगली-मिरजेतील नशेखोरांचा वाढता धुमाकूळ आणि गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Sangli Narcotics Crime

Sangli Narcotics Crime

esakal

Updated on

सांगली: नशेखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी शहरासह परिसरात उच्छाद मांडला असून, आता सामान्य नागरिकांसह खुद्द खाकी वर्दीवरही हात टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पोलिस यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. मिरजेतील मुख्य रस्त्यावर नशेखोरांनी थेट एसटी बसवर हल्ला चढवला. एवढ्यावरच न थांबता, यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यावरही चाकूने जीवघेणा वार करण्यात आला. या खळबळजनक घटनेमुळे ‘पोलिसच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय,’ हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com