

sangli-municipal-election-nota-votes-reasons
esakal
Municipal Election NOTA Trend : ईव्हीएमवर ‘नोटा’चा पर्याय आहे, तरीही उमेदवार बिनविरोध कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. याचवेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत ३० हजार ९७६ वेळेस नोटाचे बटण दाबले गेले आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील अनुसूचित जाती (महिला) या गटात ९०४ मतदारांनी ‘वरील पैकी एकही नाही’ असा पर्याय निवडला आहे. महापालिकेतील ७८ प्रभागांपैकी १८ ठिकाणी पाचशेपेक्षा अधिक मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.