

Sangli Dumper Accident
esakal
सांगली: विश्रामबाग येथील २४ तास वर्दळ असणाऱ्या आलदार चौकात आज दुपारी बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव डंपर (केए २८ एए ३९२७) ने दिलेल्या धडकेत विवाहितेचा जागीच चिरडून मृत्यू, तर पती जखमी झाले आहेत. सविता दीपक चव्हाण (वय ३९, कसबे डिग्रज, ता. मिरज) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती दीपक प्रकाशराव चव्हाण जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी डंपरचालक महंमद अफसर (उत्तर प्रदेश) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, चौकात वाहतूक पोलिस नसल्याने बेदरकार वाहतूक झाल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.