कोल्हापूर : ‘गार्डन्स क्लबच्या फ्लॉवर शोच्या किंग ऑफ शो, क्वीन ऑफ शोचा किताब संजय घोडावत ग्रुपच्या गुलांबांना मिळाला. सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी विद्यापीठ संघाने पटकावले. दरम्यान, आज गार्डन्स क्लबचे पुष्पप्रदर्शन नागरिकांसाठी खुले झाले. .Kolhapur News : 'अवकाळी’ने गुऱ्हाळघरे बंद; गुऱ्हाळमालक हवालदिल.निसर्गाचे जतन करणे आणि फुलांचे संगोपन, झाडांचे संवर्धन यासाठी ही संस्था कार्यरत आहे, हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच पाहायला मिळाले. गार्डन्स क्लब हे निसर्ग आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे,’ असे प्रतिपादन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी केले. महावीर उद्यानात गार्डन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित ५४ वे पुष्पप्रदर्शन आज नागरिकांसाठी खुले केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते..गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गार्डन्स क्लबचे नियतकालिक रोजेट आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दुपारच्या सत्रात आजी-माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्यामध्ये धनगरी नृत्य, भारूड, गाणी, लघुनाटिका यांचा समावेश होता. तसेच स्कीट कॉम्पीटिशमध्ये ‘आपली माती आपले भवितव्य’ या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत वेगवेगळे विषय निवडत स्पर्धकांनी आपली स्कीट्स सादर केली. बिना जनवाडकर व रंगकर्मी संजय हळदीकर प्रमुख अतिथी होते..यावेळी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानीस प्राजक्ता चरणे, सहसचिव शैला निकम, कार्यकारिणी सदस्य सुनीता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाषचंद्र अथणे, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, रवींद्र साळोखे, संगीता कोकितकर, जयश्री कजरिया, दीपाली इंगवले, डॉ. स्मिता देशमुख, रोहिणी पाटील, मंदा कुलकर्णी, भक्ती डकरे, मयुरा पाटील, चिनार भिंगार्डे, वर्षा वायचळ, रेणुका वाधवाणी, दीपा भिंगार्डे, राजेश्वरी पवार, संगीता सावर्डेकर, पद्मा पाटील, निशिगंधा कुलकर्णी, सुनीता निल्ले, सिद्धी गनबोटे, हर्षदा शिरगावकर, कल्पना सावंत उपस्थित होत्या. सहकोषाध्यक्षा सुनेत्रा ढवळे आणि रेणुका वाधवाणी यांनी सूत्रसंचालन केले. गार्डन्स क्लबच्या सदस्या रचना संपतकुमार व प्राजक्ता चरणे यांनी आभार मानले..Kolhapur News : ‘पंचगंगे’त दुर्गंधीयुक्त काळे पाणी; महापालिकेचे दुर्लक्ष.सळसळत्या उत्साहात रंगला बोटॅनिकल फॅशन शोया स्पर्धेनंतर सळसळत्या उत्साहात बोटॅनिकल फॅशन शो, डीजे आणि लाईटिंगच्या साथीने दणक्यात पार पडला. शोमध्ये आगळ्या-वेगळ्या कल्पनांसह पाने, फुले व फळे तसेच बिया, फळांच्या साली यांचा उपयोग करून तरुणाईने वेशभूषांचा आविष्कार सादर केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.