esakal | 'सौमय्यांच्या माध्यमातून शिळ्या कढीला ऊत आणण्याच काम'
sakal

बोलून बातमी शोधा

'सौमय्यांच्या माध्यमातून शिळ्या कढीला ऊत आणण्याच काम'

किरीट सौमय्यासारख्या मंडळींना साप सोडून भुई थोपटायची सवय आहे, नुसती भूई थोपटायची आणि प्रत्येक गोष्टीत घोटाळा आहे असे म्हणायचे..

'सौमय्यांच्या माध्यमातून शिळ्या कढीला ऊत आणण्याच काम'

sakal_logo
By
रमेश पाटील

म्हाकवे : किरीट सौमय्यासारख्या मंडळींना साप सोडून भुई थोपटायची सवय आहे, नुसती भूई थोपटायची आणि प्रत्येक गोष्टीत घोटाळा आहे असे म्हणायचे, तुमचे सगळे घोटाळे होते ते कुठे गेले? त्यामुळे या मंडळींचा कावा समोर आला आहे. मुश्रीफ यांच्यावरील आरोपामुळे जिल्हा पेटून उठला आहे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. आणूर (ता. कागल) येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

खासदार मंडलिक म्हणाले, 'मुश्रीफ यांचा घोरपडे साखर कारखाना होऊन दहा-पंधरा वर्षे झाली. त्याकाळात आम्ही विरोधक म्हणून काम करत होतो. त्यांच्या काही भानगडी असत्या तर दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी आरोप केले असते. सौमय्या यांच्या माध्यमातून काही मंडळी शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे. दिवंगत मंडलिकांचा फोटो सोशल मीडियाव्दारे व्हायरल करत आमच्यात दरी पाडण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य भरतीची परीक्षा पुढे ढकलली - राजेश टोपे

कामगारमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'ग्रामविकास खात्यामार्फत ९० दिवसात आठ लाख घरे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. चौथ्या महिन्यात सहा लाख घरांचे बांधकाम पूर्ण केले. माजी खासदार राजू शेट्टी यांना विनंती आहे की, २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्याचा तत्वतः निर्णय घेतला आहे. जोपर्यंत हा पाऊस थांबणार नाही तोपर्यत पंचनामे पूर्ण होणार नाहीत, किती हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे हे निश्चित होणार नाही. किती मदत द्यायची याचा निर्णय होणे अशक्य आहे.

यावेळी प्रकाश कुंभार यांनी स्वागत केले. उपसरपंच उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.आनंदा तोडकर, सागर कोळी, दत्तात्रय आरडे यांनी मनोगत व्यक्त केले. काकासो नरके यांनी आभार मानले. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, सरपंच रेखा तोडकर, उपसरपंच उमेश पाटील, भिमराव खोत, सदासाखरच्या संचालिका राजश्री चौगुले, उपअभियंता डी.व्ही.शिंदे, तातोबा गोते, पांडुरंग खेडे, प्रकाश कुंभार उपस्थित होते.

हेही वाचा: ऐकावं ते नवलच; कोकणात जन्माला आलं चक्क 4 पायांच कोंबडीचं पिल्लू

जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही तिघे एकत्रच - मुश्रीफ

मंत्रा मुश्रीफ म्हणाले, पाच वर्षे राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी कोणी तुमचे हात बांधले होते का? हसन मुश्रीफ ऐकतच नाही म्हणून हा खटाटोप सुरू आहे. माझी पाच वर्षे पूर्ण झाली की भाजप राज्यातच येणार नाही. त्यामुळेच त्यांचे असे केविलवाणी प्रयत्न सुरू आहेत. मी, संजय मंडलिक आणि संजय घाटगे जिल्ह्याच्या राजकारणात एकत्रच आहोत.

loading image
go to top