एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडेला पाच दिवसांची पोलिस कोठडी l Sanajy Telnade | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanajy Telnade

एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडेला पाच दिवसांची पोलिस कोठडी

इचलकरंजी : मोठ्या पोलीस बंदोबस्तात एसटी सरकार गँगचा प्रमुख संजय तेलनाडे (Sanjay Telnade) याला रविवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी (Five Days In Police Custody) सुनावली. न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर संजय तेलनाडे याला पोलिस गाडी बंद पडल्याने न्यायालय ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत (Statue of Mahatma Gandhi) पायी चालवत नेले. पोलिसांनी रस्त्याकडेला असणार्‍या नागरिकांकडून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्यांना समज देऊन चित्रीकरण डिलीट केले. तर चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले.

विविध 17 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक संजय तेलनाडे, सुनिल तेलनाडे या दोघा भावांसह एसटी सरकार गँगवर डबल मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे 2019 पासून तेलनाडे बंधू हे फरारी झाले होते. फरारी संजय तेलनाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना शनिवारी यश आले.

तेलनाडे याला रविवारी न्यायालयात पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायालया परिसरात जमणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अनेकांनी येण्याचे टाळले. न्यायालयात पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, किरण भोसले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, राजू ताशीलदार उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top