esakal | उत्तूरला अतीवृष्टीमुळे तीन हजार कोंबडीची पिल्ली दगावली
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूरला अतीवृष्टीमुळे तीन हजार कोंबडीची पिल्ली दगावली

उत्तूरकर यांचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले.

उत्तूरला अतीवृष्टीमुळे तीन हजार कोंबडीची पिल्ली दगावली

sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तूर (कोल्हापूर): येथील माजी उपसरपंच संजय उत्तूरकर यांच्या ओंकार पोल्ट्री फार्ममध्ये अतिवृष्टीने जवळील ओढ्याचे पाणी घुसल्याने तीन हजार कोंबडीची पिल्ली दगावली. उत्तूरकर यांचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले.

हेही वाचा: Rain Update - कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

उत्तूर -चव्हाणवाडी रस्त्याला तुरुक नाल्याजवळ उत्तूरकर यांचे शेत आहे. याठिकाणी त्यांनी पोल्ट्री फार्म उभा केला. याठिकाणी पहिल्यांदा सात दिवस वयाची ३ हजार पिल्ली ठेवण्यात आली. काल पासून यापरिसरात अतिवृष्टी सुरु आहे. यामुळे नाल्याचे पाणी पोल्ट्रीत घुसले व याठिकाणी ठेवलेली पिल्ली पाण्यात बुडून मृत्यू पावली. खाद्य औषध व पिल्लांचे मिळून दोन लाखाचे नुकसान झाले.

हेही वाचा: Kolhapur Rain: कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अनेक ठिकाणी पाणी

संजय उत्तूरकर हे आजरा साखर कारखान्याकडे कर्मचारी आहेत. कारखाना बंद असल्याने व पगार थकल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी कर्ज काढून व उधार उसणवारी करुन पोल्ट्री उभा केली. मात्र पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

loading image