esakal | Rain Update - कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update - कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

Rain Update - कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर पाणी, वाहतूक ठप्प

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : रात्रभर कोल्हापूर (kolhapur rain udpate) शहरासह ग्रामीण भागांत पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार (heavy rain) पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हवामान खात्याने (MID) जिह्यात पुढील पाच दिवस हाय अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

यामध्ये कोल्हापूर- गगनबावडा (kolhapur -gaganbawada) रस्त्यावर मांडुकलीजवळ पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदीचे पाणी पुलावर आल्याने बर्की (barki) गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक जिल्हा मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. कोकणात जाणार फोंडा घाटात रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक थांबली आहे. दरम्यान काल दुसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले. आज सकाळी नदीची पाणीपातळी 35. 7 फुटांवर आली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. गगनबावडा मार्गावर चार ठिकाणी पाणी आल्याने या भाागतील वाहतुक ठप्प झाली आहे. मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर (national highway) येल्लुर गावाजवळ 1 फूट पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार

loading image