सरपंच संघटनेचा सोमवारी  जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा 

सरपंच संघटनेचा सोमवारी  जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा 
Updated on: 

कोल्हापूर :  केंद्राकडून ग्रामपंचायतींना मिळालेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या रकमेवर राज्य शासनाचा कोणताही अधिकार नाही. 
तो निधी ग्रामीण विकासासाठी आहे. अध्यादेश नसताना या रकमेवरील व्याजाची रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा करण्याचे आदेश काढून ग्रामपंचायतींवर अन्याय केला आहे. कोरोनाच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या या हक्काच्या पैशावर राज्य शासन दरोडा घालत आहे. या अन्यायाबद्दल न्याय मिळण्यासाठी सोमवार (ता.17 ) रोजी जिल्हा परिषदवर आंदोलन करण्याण्याचा इशारा राज्य सरपंच संघटनेने दिला आहे. 

भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरपंचांच्या वेबिनार बैठकीत हा निर्णय झाला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना शासनाकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी प्रशासकीय अनुभव नसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर तातडीने सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील प्रशासक मंडळ नेमले आहे. त्याच्या पेक्षा ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन शासनास महत्त्वाचे वाटत नाही का? असा सवाल सदस्यांनी बैठकीत केला. 
ग्रामपंचायतीकडी डाटा ऑपरेटरांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यांना न्याय देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीकडे खर्च पडणारा निधी ऑपरेटरच्या पगारावर खर्च न होता निम्मा पैसा ठेकेदार कंपनीकडे वर्ग होतो. या सर्व विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 17 तारखेस हा मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. 
चर्चेत संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा राणी पाटील, जिल्हाध्यक्ष सागर माने, भूषण पाटील, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, हेमंत कोलेकर, विजय भोजे, शिवाजी मोरे, पंचायत समिती सदस्य रविराज चौगुले, अमोल चव्हाण, राजू पोतनीस, संभाजी सरदेसाई, तानाजी पाटील, उदय चव्हाण, राजू मगदूम, प्रताप पाटील, संध्या पाटील यांनी भाग घेतला. 

अशी ही दुहेरी लूट.... 
कोरोनाच्या नावाखाली जमा केलेल्या या रकमेतून कोरोना प्रतिबंधक गोळ्या पाचपट जादा दराने खरेदी केल्या जात आहेत. राज्य शासन ग्रामपंचायतीच्या हक्काच्या निधीची अशी दुहेरी लूट करीत आहे, अशा तीव्र भावना काही सदस्यांनी व्यक्त केल्या. 

14 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामीण भागाच्या विकासासाठीच आहे. जीआर नसताना या रकमेवरील व्याजाची रक्कम वसूल करणे ग्रामपंचायतीवर अन्याय आहे. 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाबाबत ही सत्ताधारी मंडळींकडून दुजाभाव केला जात आहे. सरपंच संघटनेची ही भूमिका योग्य असल्याने संघटनेच्या भूमिकेस माझा पाठिंबा आहे. 
- समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष, भाजप.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com