esakal | दूध उत्पादकांना लुटणाऱ्या महाडिकांना पैशाचा मग्रुरपणा; 'गोकुळ'वरुन सतेज पाटलांचे टिकास्त्र

बोलून बातमी शोधा

VIDEO: दूध उत्पादकांना लुटणाऱ्या महाडिकांना पैशाचा मग्रुरपणा; 'गोकुळ'वरुन सतेज पाटलांचे टिकास्त्र
VIDEO: दूध उत्पादकांना लुटणाऱ्या महाडिकांना पैशाचा मग्रुरपणा; 'गोकुळ'वरुन सतेज पाटलांचे टिकास्त्र
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते या व्हिडिओमध्ये म्हणतात मी सगळ्यांचा बाप आहे. हा मग्रुरपणा त्यांना कशाने आला. असा सवाल करत महाडिक यांनी गोकुळच्या माध्यमातून सर्वसामान्य दूध उत्पादकांना लुटून पैसा मिळवल्याची टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केली. चंबुखडी येथील एका सभागृहात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक करवीर तालुक्‍यातील ठरावदारांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, महाडिक यांनी सत्ताधारींनी टॅंकर स्वतःचे वापरले आहेत. मात्र दुसऱ्याच्या नावावर घेतला. गेल्या वर्षात टॅंकरच्या माध्यमातून संघाला लुटण्याचे काम त्यांनी केले आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, 14 लाख लिटर दुध संकलन असणार हे दूध संघ आहे. आता गोकुळ उरलंय अस आम्ही लोकसभा निवडणुकीत ठरवलंय. चंद्रदीप नरके यांनी आमदारकिला झळ सोसली आहे. मात्र गोकुळसाठी अग्रेसर आहेत. हा संघ सर्वसामान्यांच्या मालकीचा ठेवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आमदार राजेश पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला मतदान करून दोन रुपये जादा दर मिळवला पाहिजे. बल्क कुलर बसवला पाहिजे. दूध संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवण्यासाठी परिवर्तन घडवा.

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ही निवडणूक थांबविण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहे. सत्तारूढ आघाडीला आपल्याला निवडून आणणारे मतदार आपल्याजवळ नसल्याने निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सत्तेचे राजकारण हे या दूध संघात आले. करवीर तालुक्‍यात आमचे एकही मत फुटणार नाही. अशी ग्वाही नरके यांनी दिली.

गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, संकलन आणि वितरण याकडे सत्ताधारी मंडळीचं लक्ष नाही. गोकुळ हे ब्रॅंड आहे. त्यामुळं इतर उत्पादनात काहीच अडचण नाही. संघाने संकलनाबरोबर दर्जा निर्माण केला. मात्र योग्य मार्केटिंग करण्याची गरज आहे. आनंदराव चुयेकर यांच्यानंतर या संघात जी प्रगती करायला पाहिजे होती ती झाली नाही. ही प्रगती मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या माध्यमातून करणे शक्‍य आहे. यावेळी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील यांच्या उपस्थितीत होते.

* गोकुळ मल्टिस्टेट झाले असते तर....

गोकुळ मल्टिस्टेट झाले असत तर आज आपण या निवडणुकीत नसतो. तर गोकुळ दूध संघाचे नाव बदलून महाडिक दूध संघ ठेवले असते. सत्तारूढच्या पॅनेलला शेतकऱ्यांचे वावडे आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनेलच्या नावात कुठेही शेतकरी नाही. कारण हा संघच एका व्यापाऱ्याच्या हातात आहे. आमच्या पॅनलमध्ये शेतकरी आहे. कारण हे पॅनेलच शेतकऱ्यांचे आहे. महाडिक यांचा संबंध शेतकऱ्यांशी नाही तर टॅंकर आणि एजन्सीशी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

* सुर्य आणि चंद्रही देतील :

ठरावदारांना आता विविध आमिष दाखवली जातील. हे देतो ते देतो म्हणून दिशाभूल करतील. कारण ती महाडिक आहेत. त्यांचा तुम्हाला फोन आला तर ते प्रसंगी सूर्य आणि चंद्र ही देतो म्हणून सांगतील. तुम्ही याला बळी पडू नका,असेही पाटील यांनी आवाहन केले.

* मग्रुरीरी उतरली पाहिजे

सर्वसामान्य दूध उत्पादकांना लुटून महादेवराव महाडिक यांना पैशाच्या जोरावर मस्ती आलीय. मस्ती मग्रुरी उतरायची असेल तर करवीर तालुक्‍याने आपली ताकद लावली पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.

* गोपाळ संघ का बंद पडला :

आम्ही संघ चांगला चालवला म्हणून सांगणाऱ्यांनी स्थापन केलेला गोपाळ दुध संघ का बंद पडला. अशी टिका महाडिक यांच्यावर करत " प्रतिलिटर दुधामागे दहा रुपये दर वाढवून देतो असं कधी म्हटलो नाही. दुध उत्पादकांना दोन रुपये जास्त दर देवू असच म्हणटलो आहे. तरीही दहा रुपये म्हणालो अस वाटत असले तर तुम्ही दोन रुपये तर वाढवून द्यायचे हाते. अशी टिकाही पी.एन.पाटील यांचे नाव न घेता पालकमंत्री पाटील यांनी केली.

* एका नेत्याच्या पथ्यावर :

गोकुळ अध्यक्षपदावर ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांचा अध्यक्ष पदावरून पाय उतार झाल्यावर कामकाजावर मोठा परिणाम झाला. यामध्ये हाच कारभार गोकुळमधील एका नेत्याचा कारभार गोकुळच्या पथ्यावर पडला असल्याचेही श्री डोंगळे यांनी सांगितले.

* दूध उत्पादकांच्या दूधाला प्रतिलिटर दोन रुपये मिळावेत यासाठी आमचा लढा आहे. त्यामुळे, दोन रुपये वाढवून नाही दिले तर पुढच्यावर्षी गोकुळच्या निवडणूकीत पॅनेल करणार नाही. असे ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

Edited By- Archana Banage