
Satej Patil : शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना लोकांच्या माथी मारला जात आहे. सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा या विरोधातील लढा सुरूच राहील. या उलट हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी दिला.