esakal | 'चंद्रकांत पाटील यांनी केंद्रात जाऊन लशीसाठी प्रयत्न करावेत'

बोलून बातमी शोधा

satej patil criticized on chandrakant patil on vaccination provides for citizen in kolhapur

अर्धवट टाळेबंदीने कोरोनाही जाणार नाही आणि सर्वसामान्यांचे दुःखही कमी होणार नाही.

'चंद्रकांत पाटील यांनी केंद्रात जाऊन लशीसाठी प्रयत्न करावेत'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस आणण्यासाठी सहकार्य करावे, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. सतेज पाटील यांच्या पुढाकारातून काँग्रेस कमिटीत रक्तदान शिबिर झाले. यावेळी ते बोलत होते. अर्धवट टाळेबंदीने कोरोनाही जाणार नाही आणि सर्वसामान्यांचे दुःखही कमी होणार नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला पालकमंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘एका बाजूला मुख्यमंत्री जनतेचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप टीका करत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन केंद्रात जायला हवे आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त कोरोना लसीचे डोस मिळतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. भाजप राज्य सरकारच्या कामकाजावर चिखलफेक आणि राजकारण करत आहे. त्यापेक्षा दिल्लीत जाऊन आज जेवढी कोरोना लस महाराष्ट्राला मिळत आहे, त्यापेक्षा दुप्पट लस महाराष्ट्राला आणण्याचे काम त्यांनी करावे.’’

हेही वाचा - गोकुळ रणांगण; उमेदवारीत प्रमुख दावेदारांचा पत्ता कट, दोन्ही पॅनेलला धक्का
 

काळजी घेत परीक्षा

राज्यसेवा परीक्षेच्या जीवावर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या आकांक्षा अवलंबून आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवेच्या परीक्षा घेण्यास अडचण नाही, मात्र विद्यार्थ्यांची काळजी घेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत व सर्व नियमांचे काटेकोर पालन करत या परीक्षा घेतल्या जातील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.