Kolhapur By Election 2022 I मते विकत घेणार्‍या भाजपला जनताच जागा दाखवेल; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील
कोल्‍हापूर : मते विकत घेणार्‍या भाजपला जनताच जागा दाखवेल, सतेज पाटलांचा विरोधकांना टोला

मते विकत घेणार्‍या भाजपला जनताच जागा दाखवेल - सतेज पाटील

कोल्‍हापूर: मतदानाच्या पुर्वसंध्येला भाजकडून पैसे वाटण्याचा प्रयत्‍न झाला. भाजपचे पदाधिकारी पैसे वाटताना रंगेहात सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्‍हेही दाखल करण्यात आले आहेत. भाजपने पैसे वाटून मतं विकत घेण्याचा प्रकार केला आहे. मात्र कोल्‍हापुरच्या जनतेला विकत घेता येत नाही, हे मतदानातूनच येथील जनता भाजपला दाखवून देईल, असा विश्‍‍वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्‍त केला.

कसबा बावडा येथील पॅव्‍हेलियन मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील यांचा वाढदिवस असल्याने मतदान केंद्रावरच त्यांना शुभेच्‍छा देण्यासाठी लोक थांबले होते. या सर्व पार्‍श्‍वभूमीवर बोलत असताना ते म्‍हणाले, गेली २५ ते ३० वर्षे सर्वसामान्य लोकांची सेवा केली आहे.या सर्व लोकांनी मला आशिर्वाद देवून मोठं केलं. या काळात जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळेच आजही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिमागे कोल्‍हापुरची जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळेच जयश्री जाधव यांचा विजय निश्‍चित आहे.

हेही वाचा: Kolhapur Assembly By Election : मतदान केंद्राचे मागील गेट सुरू ठेवण्यावरून कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक

कसबा बावड्यात लोकांचा प्रचंड उत्‍साह असून मोठ्या प्रमाणात ते मतदानासाठी बाहेर पडले आहेत, याबाबत विचारले असता पालकमंत्री पाटील म्‍हणाले,उन्‍हाचा तडाखा मोठा असल्यानेच लोकांनी सकाळीच मतदानाला बाहेर पडावे, असे कार्यकतर्ांकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच लोकांच्या मनातही महागाईच्या विरोधात चीड आहे. महाइार्ग प्रचंड वाढली आहे. महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. धान्य, डाळी, तेल लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे त्यांचा प्रचंड संताप असून मतदानाच्या माध्यमातून तो बाहेर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीसांच्या कामावर शंका नको

भाजपचे पदाधिकारी पैसे घेताना रंगेहात सापडले आहेत. पोलीसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. मात्र त्यांच्यावर चंद्रकांतदादा शंका घेत आहेत. ज्या दादांनी पाच वर्षे पोलीसांचे संरक्षण घेतले. आजही घेत आहेत. असे असताना पोलीसांवर शंका घेणे योग्य नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: चंद्रकांतदादांची ऋतुराज पाटलांना 'जादू की झप्पी'; कोल्हापुरमध्ये भुवया उंचावणारे चित्र

कोल्‍हापुरातून ईडीची चौकशी होवू द्या

चंद्रकांतदादांनी काही दिवसांपुर्वीच पैशाची देवघेव झाल्यास ईडीची चौकशी लावण्याची भूमिका घेतली होती. काल रात्री भाजपचे तीन पदाधिकारी पैसे वाटप करताना सापडले आहेत. त्यामुळे या तिघांची ईडीची चौकशी करावी, अशी मागणी आम्‍ही चंद्रकांतदादांकडे केली आहे. यावर ते काय निर्णय घेतात ते पाहू. तसेच कॉँग्रेस पदाधिकार्‍यांबाबत एकही तक्रार नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

Web Title: Satej Patil Criticized To Bjp Of Rupees Distribute In Kolhapur By Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top