Satej Patil I 'राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास राज ठाकरे जबाबदार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास राज ठाकरे जबाबदार'

'राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील'

'राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास राज ठाकरे जबाबदार'

कोल्हापूर : दंगल घडवण्यासाठी चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यासाठी महत्वाचे आहेत. ठाकरे यांनी पुढी दोन दिवस काय करणार आहे हे जाहीर पणे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील, असा इशारा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिला. कदमवाडी येथे महाविकास आघाडीच्या विजयी मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा: 'सेनेतील राष्ट्रवादी प्रवक्ते राऊतांनी धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करु नयेत'

यावेळी सतेज पाटील म्हणाले, राज ठाकरे यांना महाराष्ट्रात बेरोजगारी वाढवायची आहे का? राज्यातील उद्योग बाहेर घालवायचे आहेत का? महाराष्ट्राची प्रगती होवू नये असे त्यांना वाटते का? असा राज्यातील तरुणांना प्रश्‍न पडला आहे. राजकारणाच्या विचाराने राज ठाकरे हे करत आहेत. त्यामुळे 153 कलमाखाली त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे राज्यातील युवकांनी यामध्ये सहभाग घेवू नये. आपले भविष्य बरबाद करु नये. भडक गोष्टींमागे जावू नये. पोलिसांनी योग्य ती दक्षता घेतली आहे. लोकांची सुरक्षा राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या आज आणि उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रगतशील आणि शांत आहे. तो तसाच राहिला पाहिजे. यासाठी, एसआरपीच्या 87 युनिट कार्यरत आहेत. 30 हजार होमगार्ड आहेत. राज ठाकरे हनुमान चालिसावर ठाम असतील तर आम्ही तसे नियोजन केले आहे. राज्य शासन म्हणून आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Satej Patil Criticized To Raj Thackeray Responsibility When Disturbed Of Law Hanuman Chalisa And Mns Role

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top