
Kolhapur :‘राज्यभरात पोलिस ठाणी, शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्याचे काम पूर्ण झाले आहे का? खासगी आस्थापनांवर सीसीटीव्ही आहेत; परंतु अनेकदा यातील फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले जाते. अशा व्हिडिओतून अनेकदा बदनामीचे प्रकार घडले आहेत. यावर नियंत्रणासाठी कोणते धोरण ठरवले जाणार आहे का,’ असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला.