Kolhapur Band : शाहू महाराजांच्या भूमीत…; कोल्हापुरातील सध्याच्या परिस्थितीवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

Satej Patil on  bandh in kolhapur protest due to offensive WhatsApp states kolhapur police
Satej Patil on bandh in kolhapur protest due to offensive WhatsApp states kolhapur police esakal

कोल्हापूर : कोल्हापूरात काही तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसलावल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर शहरात यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात आज (७ जून) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन देखील केलं.

यादरम्यान कोल्हापूरचे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शहरातील सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. या परिस्थितीसाठी कारणीभूत तरूणांवर कारवाई झाली पाहीजे याबद्दल कोणाचंही दुमत नसल्याचे पाटील म्हणाले आहेत.

लोकांचे हाल होऊ नयेत..

सतेज पाटील म्हणाले की, काल एक स्टेटस लावण्यात आलं त्याचा मी निषेध करतो. पोलिसांना सांगून त्या युवकांवर कारवाई करणं अभिप्रेत होतं, ती कारवाई झाली. त्यानंतर प्रशासनाने सर्व समाजातील नागरिकाना बोलवून शांततेचं आवाहन करण्याचा प्रयत्न केला होता.

तरी देखील हा उद्रेक झाला. आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आला आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. अपेक्षा एवढीच आहे की यातून सर्वसामान्य लोकांचे हाल होऊ नयेत असे सतेज पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

Satej Patil on  bandh in kolhapur protest due to offensive WhatsApp states kolhapur police
Sharad Pawar : हे घडवलं जातंय! संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

शाहू महाराजांच्या भूमीत हे होतंय हे चुकीचं

काल जी घटना घडली त्यावर पोलिस कडक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी पुढाकार घेत दोन्ही-तिन्ही समाजाच्या लोकांना एकत्र बोलवून त्यांना पोलिस कशी आणि किती कडक करवाई करणार आहेत याबद्दल विश्वास देणं अभिप्रेत होतं. ते झालेलं दिसत नाही.

शाहू महाराजांच्या भूमीत हे होतंय हे चुकीचं आहे असेही सतेज पाटील म्हणाले. तसेच त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन देखील यावेळी केलं.

ज्या तरूणाने हे केलं आहे त्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु यानिमीत्ताने कोल्हापूरमध्ये अशांतता होणं हे प्रशासनाला पुढाकार घेऊन टाळता येणं शक्य झालं असतं असेही सतेज पाटील म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

Satej Patil on  bandh in kolhapur protest due to offensive WhatsApp states kolhapur police
Sharad Pawar : भीमा-कोरेगाव प्रकरणी फडणवीसांची चौकशी व्हावी का? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com