Kolhapur : मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 'त्या' विधानाचा आम्हाला सार्थ अभिमान; असं का म्हणाले सतेज पाटील?

भाजपमध्ये ज्यांना जायचे होते ते २०१४ मध्ये गेले आहेत. आता कोणाला जायची इच्छा नाही.
 सतेज पाटील
सतेज पाटीलsakal
Summary

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर विमानतळाचा ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असा उल्लेख केल्याने याचा अभिमान असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : ‘भाजपमध्ये ज्यांना जायचे होते ते २०१४ मध्ये गेले आहेत. आता कोणाला जायची इच्छा नाही. कोल्हापुरातील जे भाजपमध्ये गेले आहेत, ते नेते आता जुन्या भाजप नेत्यांच्या डोक्यावर येऊन बसले आहेत’, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारचे दबावाचे आणि जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ करून होत असलेले राजकारण याला विरोध झाला पाहिजे. महागाईवर न बोलता देशातील राजकारण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.

 सतेज पाटील
ED च्या रडारवर असलेल्या मुश्रीफांच्या पोस्टरवर झळकले CM शिंदे, फडणवीसांचे फोटो; उलट-सुलट चर्चांना उधाण

महागाई आणि बेरोजगारीवर सरकार बोलत नाही. ही लोकशाही आहे आणि लोकांना न्याय देणे गरजेचे आहे. त्यामुळेच सर्व विरोधी पक्षांनी समर्पक अशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा आनंद आम्हाला देखील असून आमची ही आघाडी भक्कम होईल याचा विश्वास आहे.’

भाजप प्रवेशावर पत्रकारांनी विचारले असता ते (Satej Patil) म्हणाले,‘ ज्यांना भाजपमध्ये जायचे होते ते २०१४ मध्ये ते गेले आहेत. आता कोणाला जायची इच्छा नाही. मात्र, कोल्हापुरात जुन्या भाजपच्या नेत्यांवर नवीन लोक डोक्यावर येऊन बसले आहेत.’

 सतेज पाटील
Kagal Politics : कागलमध्ये हाय व्होल्टेज लढत, ती कशी हे मी आत्ताच सांगणार नाही; महाडिकांचं सूचक वक्तव्य

आमदार हसन मुश्रीफ यांच्या ‘शासन आपल्या दारी’ जाहिरातीतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो हा प्रशासकीय विषय आहे. त्याला राजकीय घेण्यात काही अर्थ नाही. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात जो काही निर्णय असेल तो वेळ आल्यावर होईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर विमानतळाचा ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असा उल्लेख केल्याने याचा अभिमान असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 सतेज पाटील
Bapusaheb Rade : कुस्ती विश्वावर शोककळा! मुकी कुस्ती बोलकी करणाऱ्या ज्येष्ठ निवेदकाचं निधन

विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरातच रहावे

आमदार पाटील म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस आयुक्तालय कोल्हापुरात व्हावे, अशी आमची मागणी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पाच जिल्ह्यांचे ‘कोल्हापुरात असलेले विशेष पोलिस महानिरीक्षकांचे कार्यालय पुण्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गेल्यावेळी आमचे सरकार असताना आम्ही हे होऊ दिले नाही. आता आमचे सरकार गेल्यानंतर जागा चाचणीसाठीचे पत्र विभागीय आयुक्तांना गेल्याचे समजते. सरकारने मध्यस्थी करून हे थांबवले पाहिजे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com