कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुजाभाव नाही; सेनेला झुकते माप

पालकमंत्री सतेज पाटील - शेती नुकसानाचा जीआर पाहून शेट्टींनी मोर्चाचा निर्णय घ्यावा
Satej Patil
Satej PatilSakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेशी दुजाभाव केला जात नाही, तर त्यांना झुकते माप देत असल्याची स्पष्टोक्तोती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केली. कालच शिवसेनेची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. तेथे जिल्ह्यातील तीनही मंत्र्याविरोधात तक्रारी झाल्या होत्या. तसेच माजी खासदार राजू शेट्टी पूरग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी मोर्चा काढणार असल्याच्या प्रश्‍नावर, शेतीच्या नुकसानीचा जीआर अद्याप निघालेला नाही. पंचनामे पूर्ण होताच तो निघेल. जीआर निघण्याची वाट शेट्टी यांनी पहावी, नंतर मोर्चाचा निर्णय घ्यावा, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पालकमंत्र्यांनी आयटी क्षेत्रातील पुरस्कारासंबंधित पत्रकार परिषदे बोलविली होती. यानंतर पत्रकारांनी त्यांना इतर विषयांवर प्रश्‍न विचारले. शिवसेनेशी कॉग्रेस-राष्ट्रवादीशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप झाल्याबद्दल विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ राजेश क्षीरसागर आणि आमदार आबीटकर यांनाही पदे दिली आहेत. वेगवेगळ्या नियुक्त्यांसंदर्भात संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी वारंवार बोलवणे होते, माझ्याकडे एकही तक्रार आलेली नाही, महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्याप्रमाणेच नियुक्त्या केल्या जात आहेत.

कोल्हापूरची बाजार समिती, वडगाव बाजार समिती, संजय गांधी निराधर योजना अशासर्वच याठिकाणी झालेल्या नियुक्त्या ह्या आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार आहेत. त्यामध्ये दुजाभाव नाही. उलट शहरात आमदार चंद्रकांत जाधव असतानाही राजेश क्षीरसागर यांना १५ कोटींचा निधी दिला आहे. दुजाभाव कसा केला याबाबत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी ही बोलणार आहे. प्रत्यक्षात शिवसेनेशी दुजाभाव केला जात नाही, तर त्यांना झुकते माप दिले जाते.‘‘

माजी खासदार राजू शेट्टी मोर्चा काढणार आहेत यावर पालकमंत्री पाटील म्‍हणाले,‘‘सध्या घरांचे, दुकानांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना मदत देण्याचे काम सुरू झाले आहे. शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. तेही मंगळवार पर्यंत पूर्ण करावेत असे सांगितले आहे. पूनर्वसनासाठी येत्या शुक्रवार पासून बैठका होणार आहेत. शेतीच्या मदतीचा जीआर (परिपत्रक) अद्याप निघालेले नाही. तो निघाल्यानंतर त्यांनी त्यातील मदतीची माहिती घ्यावी, ती त्यांना मान्य नसेल तर त्यांनी जरूर मोर्चा काढावा, लोकशाही आहे. येथे सर्वांना अधिकार आहे. मात्र नुकताच कोविड मधून आपण बाहेर पडत आहे. पॉझिटीव्हीटीचा दर कमी होत आहे, अशा वेळी मोर्चा काढणे उचित ठरणार नाही, असे वाटते.‘‘

Satej Patil
मित्रानेच केला मित्राच्या मुलाचा घात ; 'त्या' बालकाचा खूनच

शेतीतील काय कळत नाही असे हे सरकार असल्याची टिका होत असल्याच्या प्रश्‍नावर पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ शेतीच्या नुकसानीचा जीआर अद्याप निघालेला नाही. तो निघाल्यावर कळेल की शेतीतील कोणाला जादा कळते. येथे सर्वजण शेतीतील जाणकार आहेत. हे दिसून येईल.‘‘

महाईसेवा केंद्रावर ठिकठिकाणी दाखल्यांसाठी वेगवगेळा दर आकारला जात आहे. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले,‘‘ माझ्याकडे राज्यभरातून याबाबतच्या तक्रारी येत आहेत. सर्वांसाठी एकच दर ठरविता येतो काय याची ही माहिती घेतली जाईल. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com