
Kolhapur Politics : ‘शहरात प्रभागनिहाय विकासाची संकल्पना राबवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ‘मिशन कोल्हापूर, मिशन महानगरपालिका आणि मिशन काँग्रेस महापौर’ हा अजेंडा सक्षमपणे राबवला जाईल’, असा निर्धार करत कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसच्या निष्ठावंतांनी एकसंध राहावे’, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत कोल्हापूर शहरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ‘निर्धार मेळावा’ झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.