
Kolhapur Congress Vs BJP : काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत करवीर विधानसभा निवडणूक लढवणारे संताजी घोरपडे, ‘सिटीझन फोरम’चे प्रसाद जाधव, अभिषेक बोंद्रे, वैभवराजे भोसले, राजेंद्र थोरवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.