
Kolhapur District Court Revolver : कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कंबरेला रिव्हॉल्व्हर लावून गेलेल्या फिर्यादी लिपिकावर गुन्हा दाखल झाला. सुरेश संभाजी नरके (वय ४२, रा. वठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली. त्याचा शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.