
कोल्हापुरात निवासी शाळेत रॅगिंगचा प्रकार
esakal
महत्त्वाचे ठळक मुद्दे (Highlights):
तळसंदे शाळेचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल: वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार सोशल मीडियावर समोर आला.
शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप: घटनेदरम्यान शिक्षक वा कर्मचारी उपस्थित नसल्याने शाळेचे नियंत्रण आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह.
सामाजिक संघटनांची कारवाईची मागणी: शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीने शिक्षण विभाग आणि पोलिसांकडे तात्काळ कारवाई व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची मागणी केली.
Kolhapur Crime News : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील निवासी विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. दरम्यान हा व्हिडीओ पूर्वीचा असल्याचे अध्यक्षा रुपाली पाटील यांनी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितले.