म्हाकवे : सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे सायकलवरून (Bicycle) पोहायला निघालेल्या आयुष शिवाजी हरेल (वय १४) या शाळकरी मुलाचा संरक्षण कठड्याला धडकून दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा चुलतभाऊ अनुज नेताजी हरेल (वय १६) याला गंभीर दुखापत झाली आहे. .याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील आयुष व त्याचा चुलतभाऊ अनुज हे दोघे दुपारी सायकलवरून कालव्याला पोहायला चालले होते. वेगात असणाऱ्या सायकलवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या सिमेंटच्या कठड्यावर सायकल जोरात धडकली. यामध्ये आयुषच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला..VIDEO : भरसभेत मुख्यमंत्र्यांचा चांगलाच पारा चढला अन् थेट पोलिस अधिकाऱ्यावरच उगारला हात, नेमकं काय घडलं?.त्याला व अनुजला तत्काळ कोल्हापूर (Kolhapur) येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच आयुषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सायकलवर पाठीमागे बसलेल्या अनुजलाही गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..IPS Birdev Done : विषयच हार्ड! 'कामयाब होने के लिए नहीं... काबील होने के लिए पढो'; यश खेचून आणणारा मेंढपाळाचा 'बिरदेव'.आयुष हा येथील महालक्ष्मी हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्यामागे आई-वडील असा परिवार आहे. तो एकुलता एक होता. यात्रा असतानाही आयुष पोहायला जाण्यासाठी घाई करत होता. उभा राहूनच त्याने जेवण केले. गावची महालक्ष्मी यात्रा असल्याने संपूर्ण गाव गजबजून गेले होते. यावेळी यात्रेसाठी आलेले नातेवाईक आयुषला बसून जेवण कर म्हणून सांगत होते. त्याचे मित्रही त्याला यात्रेत जाण्यासाठी बोलवत होत; परंतु लगेच पोहून येतो म्हणत तो पोहायला गेला..वडिलांचे ऐकायला हवे होते...यात्रा असल्यामुळे सर्व जण गडबडीत होते. आयुष व अनुज नुकतेच पोहायला शिकले होते, तरीही त्यांना कधीही एकटे पोहायला पाठवले जात नव्हते. मित्रपरिवार आणि वडीलधारी मंडळी सोबत घेऊनच त्यांना पोहायला घेऊन जात असत. ‘आपण असल्याशिवाय पोहायला जायचे नाही’, असे वडिलांनी सांगितले असतानाही घरच्या मंडळींची नजर चुकवून आयुष पोहायला गेला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.