कोल्हापूर : मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या शिव नवीन पटेल (वय १४, रा. टिंबर मार्केट) याचा रंकाळा (Rankala) शेजारील पतौडी खणीत बुडून मृत्यू झाला. काल दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या मित्रांनी घरी जाऊन तो बुडाल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.