गडहिंग्लजमधील शाळांत अद्याप प्रवेश कमीच !

Schools In Gadhinglaj Still Have Low Enrollment Kolhapur Marathi News
Schools In Gadhinglaj Still Have Low Enrollment Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारी कुटुंब कोरोनाच्या धास्तीने गावीच थांबली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या वाढणार, असे चित्र होते. मात्र, गडहिंग्लज तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांत पहिलीसाठी आतापर्यंत एक हजार 450 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 115 विद्यार्थ्यांची यंदा घटच झाली आहे. त्यामुळे पटसंख्या वाढीसाठी प्रशासन व शिक्षकांच्या पातळीवर तातडीने हालचाली करणे आवश्‍यक आहे. 

कोरोनामुळे मुंबई-पुणे या ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक असणाऱ्या चाकरमान्यांनी गावाकडे परतण्यास सुरवात केली. गडहिंग्लज तालुक्‍यात 18 हजारांहून अधिक लोक बाहेरगावाहून आले. दरम्यान, लॉकडाउन शिथिल होऊ लागल्याने खासगी कंपन्यांनी कामकाजाला सुरवात केली. त्यामुळे अनेक चाकरमानी पुन्हा कामावर हजर होऊ लागले. पण, त्यांचा कुटुंब कबिला गावाकडेच राहिला आहे. शिवाय वाढती महागाई, लॉकडाउनमुळे गमावलेली नोकरी, कमी झालेले पगार आदी कारणामुळे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत कमी विद्यार्थी प्रवेश घेतील, असे चित्र होते. 

मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांचे वास्तव चित्र वेगळेच असल्याचे समोर येत आहे. गतवर्षी पहिलीसाठी एक हजार 565 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा आतापर्यंत एक हजार 450 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वेक्षणाबाहेरील 65 दाखलपात्र विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तरीही गतवर्षीपेक्षा 115 विद्यार्थी कमीच आहेत. त्यामुळे पटवाढीसाठी शिक्षण विभाग व शिक्षकांकडून पटवाढीसाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. 

"टार्गेट-425' 
यंदा सहा वर्षावरील एक हजार 810 दाखलपात्र विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक हजार 385 विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश निश्‍चित झाला आहे. अद्याप 425 विद्यार्थी शिल्लक आहेत. त्यामुळे पट वाढवायचा असेल, तर याच 425 विद्यार्थ्यांना टार्गेट करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने हालचाली होणे अपेक्षित आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. पण, अद्याप शाळांना सुरवात झालेली नाही. त्यामुळे परिवर्तनाला अद्याप संधी उपलब्ध आहे. 

शिक्षक कोरोना ड्यूटीवरच... 
शैक्षणिक कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश असले तरी प्राथमिक शिक्षकांची अद्याप कोरोनाची ड्यूटी संपलेली नाही. जवळपास 40 शिक्षक क्वारंटाईन केंद्राचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर दहाहून अधिक शिक्षक तीन नाक्‍यांवर तैनात आहेत. याव्यतिरिक्त अन्य शिक्षकांकडून सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. याचाही पटवाढीच्या प्रयत्नांवर परिणाम झाला असण्याची शक्‍यता आहे, असे असले तरी पटवाढीची अशी संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com