म्हणुन कर्जमाफीची दुसरी यादी गेली लांबणीवर....

The second list of loan waivers will be postponed
The second list of loan waivers will be postponed
Updated on

कोल्हापूर - मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या यादीलाच खो बसला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण देत आज प्रसिद्ध होणारी कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी लांबणीवर टाकली. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता दोन महिने प्रतिक्षा करावी लागण्याची शक्‍यता आहे.

एक हेक्‍टरपर्यंत दीड लाख रुपयांचे कर्ज माफ

राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत एक हेक्‍टरपर्यंत दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. सहकार विभागामार्फत तालुका पातळीवर कर्जदारांच्या यादीची छाननी करून ती सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड केली. केवळ या कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे लवकरच मिळतील अशी आशा वाटत असतानाच आज त्याला खो बसला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (ता. २४) राज्यातील ६८ गावांतील १५ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले (ता. पन्हाळा) व हेर्ले (ता. हातकणंगले) या दोन गावांतील २०८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या २०८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपोटी ६६ लाख ४५ हजार रूपयांची रक्कमही दोन दिवसांपुर्वी संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आली. कर्जमाफीसाठी पात्र राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांची यादी आज प्रसिध्द होणार होती, या यादीकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहीले असतानाच ही यादी लांबवणीवर पडल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असलेल्या १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भात सरकारने निवडणूक आयोगाकडे ही प्रक्रिया पुर्वीचीच असल्याचे सांगत पैसे वर्ग करण्यास परवानगी मागितली आहे.

हेच ते १९ जिल्हे

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर न झालेल्या जिल्ह्यात कोल्हापूरसह ठाणे, नगर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला व बुलढाणा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com