राज्यातील ३० प्रमुख धरणांवर भूकंपाची परिमाणे नोंदविणारी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राधानगरी : भूकंपप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या काळम्मावाडी धरणस्थळावर (Kalammawadi Dam) गेल्या दीड दशकापासून भूकंपमापन यंत्रणात अस्तित्वात नाही. धरणस्थळावरील भूकंपमापन केंद्र यंत्रणा (Seismological Center System) कालबाह्य व तांत्रिक बिघाडाने २०१० मध्ये बंद पडली.