आंबा परिसरातील निसर्ग अनुभवतोय निरव शांतता 

serenity of nature in the mango area
serenity of nature in the mango area

आंबा : मान्सून पावसाचे आगमन झाले असून शाहुवाडी तालुक्‍यात हिरवाई नटू लागली आहे. असे असले तरी आंबा परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर अजून निरव शांतता दिसून येत आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पर्यटनावर बंदी आहे. दळणवळणाचे सर्व मार्ग बंद आहेत. 

दोन्ही बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेल्या आंबा - विशाळगड मार्गावर गाड्यांचा आवाज आणि पर्यटकांचा गोंगाट नसल्यामुळे पर्यटकांना मोहित करणारा वाघझरा शांतता अनुभवत आहे. माणसांची वर्दळ नसल्यामुळे माकडांनीही या ठिकाणी पाठ फिरवली आहे. रानमेवा झाडावरच लगडलेला आहे. प्राण्यांचे आवाज, वृक्षांचे ध्वनी, पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची शीळ, झाडावरुन खाली पडणारे टपोरे थेंब आणि झऱ्यातून मंद वाहणारे पाणी आपले अस्तित्व जाणवून देत आहे. 

पशुपक्षी स्वच्छंदपणे वावरत आहेत. रानगव्यांसह जंगली श्वापदे पाणवठ्यावर मुक्त संचार करत आहेत. ऐतिहासिक किल्ले विशाळगड आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या पावनखिंडीत घुमणारे जयजयकाराचे आवाज नि:शब्द झाले आहेत. मानोली डॅमवरच्या बोटींगमुळे माणसांच्या वर्दळीने गजबजणारा हा परिसर, कोकण दर्शन पॉइंट व अंबेश्वर देवराई सुनसान आहे. वाहनांची वर्दळ थांबल्याने मोकळ्या रस्त्यावरून सापांची वळवळ बिनधास्त सुरू आहे. 

दृष्टिक्षेप 
- आंबा येथे निसर्गरम्य परिसर खुणावतोय 
- निसर्गाचा आनंद घेण्यावर लॉकडाऊन मुळे मर्यादा 
- वर्दळ नसल्याने माकडांनीही फिरवली पाठ 
- पशुपक्ष्यांचा स्वच्छंदपणे वावर 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com