मालिकांचा पुन्हा झाला श्रीगणेशा...! 

The series has started again ...!
The series has started again ...!
Updated on

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या दूरचित्रवाणी मालिकांच्या शूटिंगला आजपासून येथे पुन्हा प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपायांसह शूटिंग होणार आहेत. केर्ली (ता. करवीर) येथे "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या शूटिंगचा मुहूर्त आज  झाला. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकूणच मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार व तंत्रज्ञांचे गेली दोन महिने प्रयत्न सुरू होते. त्याला "सकाळ'ने पाठबळ देत सर्व घटकांना झूम मीटिंग ऍपच्या माध्यमातून एकत्र आणून चर्चा घडवून आणली होती. कोल्हापुरात लवकरात लवकर शूटिंग सुरू व्हावीत, अशी स्पष्ट भूमिका "सकाळ'ने घेतली. परिणामी, केवळ जुन्याच मालिका नव्हे तर आता लवकरच काही नवीन मालिकांच्या शूटिंगलाही कोल्हापूर शहर आणि परिसरात प्रारंभ होणार आहे. 

राज्यातील विविध ठिकाणी शूटिंगसाठी आता परवानगी मिळाली असली तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित ठिकाण म्हणून कोल्हापुरात सर्वांत पहिल्यांदा परवानगी देण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर "तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील हार्दिक जोशी, अक्षया देवधर यांच्यासह कलाकार अगोदरच कोल्हापुरात दाखल झाले होते.

त्यांच्या आवश्‍यक त्या सर्व तपासण्याही पूर्ण झाल्या होत्या. सोमवारपासून केर्ली येथील लोकेशन्सवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध औषधांची फवारणी व सॅनिटायझरच्या कामाला प्रारंभ झाला होता. या मालिकेबरोबरच आता "जीव झाला येडापीसा', "राजा राणीची गं जोडी' या मालिकांच्या शूटिंगलाही येत्या चार दिवसांत प्रारंभ होणार आहे. कोकणात शूटिंग होत असलेल्या "रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या शूटिंगलाही लवकरच प्रारंभ होणार आहे. या मालिकांशिवाय आणखी काही नवीन मालिका आणि वेब सीरिजच्या शूटिंगबाबत अंतिम टप्प्यात बोलणी आली असून, लवकरच त्यांचेही शूटिंग येथे सुरू होईल, असे अभिनेता आनंद काळे यांनी सांगितले. 

खबरदारी घेऊनच शूटिंग... 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व ती आवश्‍यक खबरदारी घेऊनच मालिकेच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा सेटवर आलो असलो तरी सेटवर आता सॅनिटायझेशन आणि इतर आवश्‍यक गोष्टींवर सर्वांनीच भर दिला आहे. शासनाच्या नियमानुसारच सर्व गोष्टींचे पालन केले जात असल्याचे अभिनेता हार्दिक जोशी, अक्षया देवधर यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेप 
- "सकाळ'ने झूम मीटिंगच्या माध्यमातून आणली चर्चा घडवून 
- केर्ली येथे शुटींगचा झाला मुहूर्त 
- कलाकार, तंत्रज्ञांचे गेली दोन महिने प्रयत्न 
- नवीन मालिकांच्या शूटिंगलाही होणार लवकरच प्रारंभ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
UPI Transaction Charges on Payments
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com