तब्बल 12 तोळे दागिन्यांवर घरगड्याकडून डल्ला; परदेशी सहलीवर गेलेल्या निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात चोरी

Rajarampuri Police Case : फिर्यादी शिरीष शंकरराव कुंदे (वय ६५, रा. जवाहरनगर) २६ नोव्हेंबरपासून सहलीनिमित्त परदेशात होते.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

काही दिवसांपूर्वी कुंदे यांच्या घरातील कपाटाची एक चावी हरवली होती. त्या चावीचा वापर या चोरीसाठी झाल्याचा अंदाज पोलिसांनी काढला.

कोल्हापूर : परदेशी सहलीवर (Foreign Trip) गेलेल्या सेवानिवृत्त जीएसटी उपायुक्तांच्या घरातील १२ तोळे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरी झाल्याने माहितगाराचे हे काम असावे, असा पोलिसांना संशय होता. महिन्याभरापूर्वीच घरगडी म्हणून आलेल्या कामगारानेच ही चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी निखिल राजू पाटील (वय २५, रा. विक्रमनगर) याला राजारामपुरी पोलिसांनी (Rajarampuri Police) ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com