esakal | कोल्हापुरात कोरोना टेस्ट सक्तीची: रिपोर्ट निगेटिव्ह तरच एंट्री;जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश

बोलून बातमी शोधा

Seven days of forced segregation of outsiders Collector Daulat Desai covid 19 marathi news

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आर टी पी सी आर टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच प्रवेशद्वारांवर तपासणी नाके करणार असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. 

कोल्हापुरात कोरोना टेस्ट सक्तीची: रिपोर्ट निगेटिव्ह तरच एंट्री;जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश
sakal_logo
By
निवास चौगले

कोल्हापूर : राज्यातील कोरोनाबाधित जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरीकांना कोरोना चाचणीचे सर्टीफिकेट सक्तीचे करण्यात आले आहे, उद्यापासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ज्यांच्याकडे असे सर्टीफिकेट नसेल त्यांना सक्तीने सात दिवसांचे संस्थात्मक किंवा गृह अलगीकरण करण्यात येईल, असे आदेश आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले. 


दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरीकांकडे त्यांनी लसीकरणाचे दोन्हीही डोस घेतले असल्याची नोंद असल्यास त्यांना या नियमातून सुट देण्यात आली आहे, तथापि त्यांना सात दिवस गृह अलगीकरणात रहावे लागेल, असेही या आदेशात म्हटले आहे. बाहेरून येणाऱ्या या नागरीकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबादारी ग्रामीण भागात ग्राम समितीला तर शहरात प्रभाग समितीला देण्यात आली असून या समित्या जो निर्णय घेतील तो संबंधितांवर बंधनकारक असेल असेही यात म्हटले आहे. 


राज्यातील पुणे, मुंबईसह सांगली, सातारा, नाशिक आदि जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या मोठ्या शहरात रोज हजाराहून अधिक रूग्ण सापडत आहेत. या शहरात जिल्ह्यातील अनेकजण नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने रहायला आहेत. त्या जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील नागरीकांनी पुन्हा कोल्हापुरकडे येण्यास प्राधान्य दिले आहे. शुक्रवारपासून असे हजारो नागरीक कोल्हापुरात दाखल झाले आहेत, पण त्यांची कोणतीही चाचणी केली जात नाही किंवा त्यांना अलगीकरणही करण्यात येत नाही. 

या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले. त्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्यांन कोरोना चाचणीचा आरटीपीसीआर किंवा अँटीजेनचा अहवाल निगेटीव्ह असेलेले प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश देण्याचे आदेश आज काढले. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल त्यांना सक्तीने गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणात रहावे लागेल. परजिल्ह्यातून येणाऱ्या या नागरीकांबाबात काही लोकप्रतिनिधींची प्रशासनाकडे तक्रार केल्याच्या पार्श्‍वभुमीवर हा निर्णय घेतल्याचे देसाई यांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे