
Kolhapur Killing Crime : किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याबद्दल दगड आणि बॅटने मारहाण करीत येथे सातजणांनी एका तरुणाचा खून केला. आशुतोष सुनील आवळे (वय २६, शांतीनगर वळिवडे, सध्या रा. आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने तपास करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्व संशयितांना ताब्यात घेतले. शंकर बापू बनसोडे (वय १९), राजू सचिन काळोखे (२०, कोयना कॉलनी), शुभम संजय कांबळे (१९) आणि करण महेश डांगे (१८, सर्व रा. गांधीनगर) या सर्वांना अटक केली आहे. या गुन्ह्यात तीन अल्पवयीनांनाही ताब्यात घेतल्याचेही गांधीनगर पोलिसांनी सांगितले.