हातकणंगले : येथील ओवी सागर पुजारी (वय ७) या चिमुकलीचा ‘एसएसपीई’ (सबक्युट स्क्लेरेजिंग पेन्सेफिलाइटीस) या असाध्य व दुर्मीळ आजाराने (SSPE Disease) उपचारादरम्यान काल सायंकाळी मृत्यू झाला. ती या आजाराशी सहा महिन्यांपासून झुंज देत होती. तिचे ग्रोवरचे लसीकरणही झाले होते.