
Rickshaw Accident Chiplun : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव निघालेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडकेत पाच जण ठार झाले. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षामागून येणाऱ्या ट्रक व मोटार यांच्यामध्ये सापडून रिक्षाचा चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक, प्रवासी पती-पत्नी व त्यांचा चार वर्षांचा चिमुकला, मोटारचालक असे पाच जण जागीच ठार झाले. ही घटना पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीसमोरील कॅनॉलवर सोमवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुकाच हादरला. या अपघातप्रकरणी मोटारचालकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.