Rankala Lake Pollution Issue : पावसाळ्यानंतर पुन्हा घातलेला मातीचा बंधारा सांडपाणी रोखण्यात अपयशी ठरत असल्याने रंकाळा तलावाचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे
कोल्हापूर : रंकाळा तलावात शाम सोसायटीकडील नाल्यातील सांडपाणी मिसळू नये यासाठी घातलेला मातीचा बंधारा निरुपयोगी ठरत आहे. त्या बंधाऱ्यातून सांडपाणी वाहून तलावात मिसळत असून, महापालिकेकडून मात्र दुर्लक्ष होत आहे.