
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनल्स येथे महिलेवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने संशयित पर्यवेक्षक गणेश दिलीप हंकारे (वय ३०, कोल्हापूर) याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.