कोल्हापुरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी

shahu maharaj 126 birth anniversary celebration in kolhapur
shahu maharaj 126 birth anniversary celebration in kolhapur
Updated on

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज साधेपणाने साजरी झाली. लक्ष्मीविलास पॅलेस येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू राजांच्या प्रतिमेचे, तर दसरा चौकातील पुतळ्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पूजन झाले. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले. दरम्यान, जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, तालमी, मंडळे, शाळा व महाविद्यालयांत शाहू राजांच्या विचारांचा जागर घालण्यात आला. 

दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा जयंती साधेपणाने साजरी झाली असली, तरी सोशल मीडियाद्वारे शाहू विचारांचा जागर घालण्यात आला. लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सामाजिक न्यायमंत्री विश्‍वजित कदम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू राजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रा.संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. 


लक्ष्मीविलास पॅलेसच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. तो लवकरच पूर्ण केला जाईल. 
- सतेज पाटील (पालकमंत्री) 

लोकांच्या मनातील राजे म्हणजे शाहू महाराज आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर विविध उपक्रमांतून होत आहे. शाहू राजांचे विचार दिशादर्शक आहेत. 
- विश्‍वजित कदम (सामाजिक न्यायमंत्री) 

सर्वपक्षीय लोक येऊन अभिवादन करतात. शाहू राजांमुळे बहुजन समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढले. आरक्षण देण्याचा निर्णय शाहूंनी घेतला. ते काळाच्या ओघात कोठे गायब झाले, हे माहीत नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. कृषी, उद्योग, पाणी व्यवस्थापनात कोल्हापूर जिल्हा पुढे राहिला. त्यामागे शाहूंची दूरदृष्टी कारणीभूत होती. 
- चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष, भाजप) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Medicinal Plants in Ajra Amboli
1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
Shirol Farmers Water Shortage
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Marathi News Esakal
www.esakal.com