MP Shahu Maharaj successfully secures ₹65 crore fund for development projects in his constituency.Sakal
कोल्हापूर
Kolhapur : खासदार शाहू महाराज यांच्या प्रयत्नातून ६५ कोटींचा निधी मंजूर
६५ कोटींच्या निधीला रस्ते, वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत खासदार शाहू महाराज यांनी निधीची मागणी केली होती. लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार आहे.
कोल्हापूर : गडहिंग्लज - नागनवाडी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाला ४० कोटी, तर कोल्हापूर शहरातील आयटीआय - पाचगाव- वडगाव - खेबवडे - बामणी या रस्त्यांसाठी २५ कोटी, असा ६५ कोटींच्या निधीला रस्ते, वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. खासदार शाहू महाराज यांनी रस्ते, वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामांसाठी निधीची मागणी करणारे पत्र दिले होते.

