Kolhapur Crimeesakal
कोल्हापूर
Kolhapur Crime : व्याजाच्या पैशासाठी शरीरसुखाची मागणी, दारू पाजून बेशुद्ध करून वारंवार महिलेवर बलात्कार; एकाला अटक
Kolhapur Crime News : रामा जानकर याने फिर्यादी महिलेला (Woman) २०१४ मध्ये दहा टक्के व्याजाने सत्तर हजार रुपये दिले होते. व्याज थकल्यानंतर फिर्यादी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा जानकरने घेतला.
Summary
रामा जानकर सारखे अनेकजण आज शहर आणि शहराच्या मुख्य भागात खासगी सावकारी करून अनेकांना दमदाटी करीत आहेत. बळजबरीने कोऱ्या धनादेश आणि स्टॅम्पवर सह्या घेतल्या जात आहेत.
कोल्हापूर : व्याजाने पैसे देऊन व्याजापोटी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी (Shahupuri Police) एकास अटक केली. रामा विठ्ठल जानकर (वय ४६,रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. दारू पाजून बेशुद्ध करून छायाचित्र आणि व्हिडिओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक सुख घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
