

Shaktipeeth Highway
esakal
कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गावरून आज पुन्हा एकदा शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात कलगीतुरा रंगला. आज शिवाजी चौकात क्षीरसागर यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या दोघांनी पुन्हा एकमेकांना आव्हान दिले.