esakal | इंदुरीकर महाराज दोषी आढळल्यास कारवाई होईल : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

shamburaje desai say If Indurikar Maharaj is found guilty action will be taken

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यात दोष आढळल्यास निश्चित कारवाई होईल. असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

इंदुरीकर महाराज दोषी आढळल्यास कारवाई होईल : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य याची माहिती मागवण्यात आली असून ती तपासून घेतली जाईल. त्यात दोष आढळल्यास निश्चित कारवाई होईल. सामाजिक भावना दुखावणे आणि लिंगभेद बाबत वक्तव्य या गोष्टी प्रामुख्याने तपासू असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य त्यांनी केलं होते.

वाचा - राजू शेट्टींनी केलं आवाहन अन् तरुणीने घेतला हा धडाकेबाज निर्णय... 

कोल्हापूर पोलीस कौतुकास प्राप्त

राजस्थान मधील बिष्णोई  टोळीशी चार हात करून त्यांना जेरबंद करणारे कोल्हापूर पोलीस कौतुकास प्राप्त आहेत. त्यांचा उचित सन्मान व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासनही देसाई यांनी दिले.

loading image