
सागर चौगले
माजगाव : बियाणे, खते, औषधे, मजुरी व मशागत यांचे गगनाला भिडलेले दर, हमीभावाचा अभाव, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या विविध संधी व दुग्ध व्यवसाय उत्पन्नाचे प्रमुख साधन बनल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील माजगावसह आसपासच्या गावात शेती करायला वाटेकरी मिळेनासे झाले आहेत. खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने ‘वाट्याने शेती नको रे बाबा..!’ असे शेतकरी म्हणत आहेत.