
हातकणंगले: दुधाची किटली घेऊन रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बाळू सोमा गावडे (वय ६०, रा. आळते, ता. हातकणंगले) हा मेंढपाळ जागीच ठार झाला. हा अपघात वडगाव - हातकणंगले मार्गावर आळतेच्या हद्दीत जल्लोष हॉटेलसमोर आज सकाळी साडेसात वाजता घडला. अतुल सुरेश फारणे (रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असे दुचाकीस्वाराचे नाव असून, त्याच्याविरुद्ध हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.